कल्याण डोंबिवलीतील गणेशोत्सवावर २१७० CCTV कॅमेऱ्याची नजर
By मुरलीधर भवार | Published: August 29, 2022 03:26 PM2022-08-29T15:26:22+5:302022-08-29T15:27:16+5:30
गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची माहिती
मुरलीधर भवार
कल्याण- गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणोशोत्सव र्निबधात पार पडला. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदाच्या गणेशोत्सव उत्सहात साजरात केला जाणार आहे. गणेशोत्सवात उत्सवाचे पावित्र्य राखले जावे आणि सुरक्षितता पाळली जावी यासाठी 2 हजार 170 सीसीटीव्हीची कॅमे:यांची नजर उत्सवावर राहणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली हद्दीत 287 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून गणोश मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. तसेच घरगूती गणपतींची संख्या 42 हजार 270 आहे. त्याचबरोबर घरगूती गौरी पूजनाची संख्या 3 हजार 467 आहे. गणोशोत्सव आनंदात साजरा केला जात असल्याने काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंडळासह नागरीकांना करण्यात आले आहे. एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या पोलिसांच्या उपक्रमांतर्गत शहरात 1 हजार 527 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या 643 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीचे पावित्र्य राखले जावे यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे सूचित केले आहे.
गणेशोत्सव पार पडल्यावर हा कॅमेरा मंडळांनी शेजारच्या चौकात एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या उपक्रमांतर्गत लावायचा आहे. गणेशोत्सव काळात एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. 150 पोलिस अधिकारी, 250 होमगार्ड आणि एसआरपीच्या दोन पालटून बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. ज्याठिकाणी अवजड वाहनांना बंदी आहे. तसेच एकेरी वाहतूक आहे. याचे पालन वाहन चालकांसह गणेश भक्त आणि मंडळांनी करायचे आहे. त्याची अधिसूचना ठाणे वाहतूक नियंत्रम पोलिस कार्यालयाकडून काढण्यात आली आहे.