उल्हासनगरात पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा; महापालिकेला मनसेचा इशारा
By सदानंद नाईक | Updated: February 10, 2025 23:01 IST2025-02-10T23:00:03+5:302025-02-10T23:01:16+5:30
श्वान निर्बीजिकरण बंद

उल्हासनगरात पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा; महापालिकेला मनसेचा इशारा
उल्हासनगर : कॅम्प नं-१, तानाजीनगर परिसरात पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्यांने हैदोस घालत तब्बल २२ जणांना चावा घेतल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. याप्रकाराने दहशतीचे व भीतीचे वातावरण परिसरात निर्माण होणं पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी मनसेने केली.
उल्हासनगर महापालिकेने श्वान निर्बीजिकरण प्रक्रिया सुरु करून १० हजार पेक्षा जास्त श्वानाचे निर्बीजिकरण करूनही कुत्र्याची संख्या कमी होण्या ऐवजी वाढल्याचे चित्र आहे. महापालिकेने ठेका संपुष्टात येताच नव्याने श्वान निर्बीजिकरण करण्याची निविदा काढली असून वाढीव दरा अभावी ठेका देण्यात आला नाही. असी माहिती आरोग्य विभागाच्या वैधकीय अधिकारी डॉ मोना शर्मा यांनी दिली. दरम्यान कॅम्प नं-१, तानाजीनगर परिसरात मोकाट व पिसाळलेल्या एका कुत्र्यांने तब्बल २२ जणांना चावा घेतल्याचा आरोपी मनसेचे शहर. संघटक मेन्नूद्दीन शेख यांनी केला. अश्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त तात्काळ करावा, अन्यथा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात हे मोकाट कुत्रे सोडणार असल्याचा निर्वांनीचा इशारा शेख यांनी दिला.
तानाजीनगर येथील रंजना सोनवणे, कोकिळा जोगदंड या महिलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून त्याआधी प्राची लुंड या चिमुरडीवर ही हल्ला केल्याची माहिती मनसेचे मेन्नूद्दीन शेख यांनी दिली. तसेच परिसरात शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अनेक लहान-लहान मुलांना या कुत्र्यांनी चावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोकिळा जोगदंड यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात तर रंजना सोनवणे यांच्यावर कल्याण येथील रुक्मिणी रुग्णालय उपचार होत आहे. याबाबत महापालिकेच्या वैधकीय अधिकारी डॉ मोनिका शर्मा यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेला दुजोरा दिला. तसेच श्वान निर्बीजिकरण केंद्र पुन्हा सुरु होण्याचे संकेत दिले.