काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांस, गाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड

By मुरलीधर भवार | Published: May 18, 2023 06:33 PM2023-05-18T18:33:04+5:302023-05-18T18:34:00+5:30

खडकपाडा पाेलिसांनी महापालिकेच्या आराेग्य विभागातील जनावरांच्या डाॅक्टरला बाेलावून घेतले.

300 kilos of meat in a black and yellow taxi it will be revealed after the investigation whether it is beef or not | काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांस, गाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड

काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांस, गाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड

googlenewsNext

कल्याण-मांस भरलेल्या एका काळी पिवळी टॅक्सीला जप्त करीत दाेन जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पाेलिस ठाण्यात घडली आहे. जप्त करण्यात आलेले मांस हे गाेमांस आहे की नाही हे तपासा अंती समाेर येणार आहे. सध्या खडकपाडा पाेलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा तपास भिवंडी नारपाेलीस स्टेशनला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

कल्याणच्या खडकपाडा पाेलिस ठाण्यात एक माहिती पाेलिसांना मिळाली की, एका काळी पिवळया टॅक्सीमधून मांसांची वाहतूक केली जाते. खडकपाडा पाेलिसांनी ही टॅक्सी ताब्यात घेत मांस जप्त केले आहे. टॅक्सी चालकाला ताब्यात घेतले आहे. खडकपाडा पाेलिसांनी महापालिकेच्या आराेग्य विभागातील जनावरांच्या डाॅक्टरला बाेलावून घेतले. या टॅक्सीत मिळून आलेले जवळपास ३०० किलाे मांस हाेते. हे मांस गाेमांस आहे की नाही हे तपासाअंती उघड हाेणार आहे.

मात्र खडकपाडा पाेलिसांनी या प्रकरणी टॅक्सी चालकासह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हा गुन्हा भिवंडीतील नारपाेली पाेलिस ठाण्यास वर्ग केला जाणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. ठाणे भिवंडी राेडवर माणकाेली परिसरात हीटॅक्सी पाेहचली असता गाेररक्षक समितीचा कार्यकर्त्यांनी टॅक्सीला थांबविले. एक कार्यकर्ता त्या टॅक्सी बसला आणि ती टॅक्सी थेट खडकपाडा पाेलिस ठाण्याला घेऊन आला.

Web Title: 300 kilos of meat in a black and yellow taxi it will be revealed after the investigation whether it is beef or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण