कल्याण क्रीडा महोत्सवात ४२० स्पर्धेकाचा सहभाग
By मुरलीधर भवार | Published: January 8, 2024 05:34 PM2024-01-08T17:34:05+5:302024-01-08T17:34:40+5:30
ही स्पर्धा कल्याणच्या ब्राइटोन वर्ल्ड स्कूल आणि शहाड येतील रीजन्सी अंटालिया येथे संपन्न झाली.
कल्याण - स्पोर्ट्स केअर फाऊंडेशन आणि रोटर’क्टट क्लब ऑफ उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवात शालेय गायन आणि नृत्य आणि स्केटिंग स्पर्धात ठाणे जिल्ह्यामधून ४२० खेळाडू सहभागी झाले होते.
ही स्पर्धा कल्याणच्या ब्राइटोन वर्ल्ड स्कूल आणि शहाड येतील रीजन्सी अंटालिया येथे संपन्न झाली. ही स्पर्धा ०८ , १० , १२ आणि १४ या वयोगटात पार पडली. स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या टीम गरुडने विजेतेपद, टिटवाळयाच्या स्किलफुल अकॅडमीने उपविजेतेपद, बदलापूरच्या इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग अकॅडमीने तृतीय क्रमांक पटकावला. डान्स स्पर्धेत टिटवाळा मेरिडियन शाळेने विजेते पद, गायन स्पर्धेत कल्याणची गुरुनानक स्कूल विजयी ठरली. गायन आणि नृत्य स्पर्धेमध्ये सोलो आणि ग्रुप यांचा समावेश होता.. स्केटिंग स्पर्धेसाठी प्रमुख पंच गितेश वैद्य, गायन स्पर्धेसाठी सुनील गोडांबे, राहुल सपकाळे, नृत्य स्पर्धेसाठी स्वप्निल शेजवळ, दीप्ती मिश्रा यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पप्पू सैनी, रफिक शेख, मितेश जैन, गणेश बागुल, मुकुंद चव्हाण, हनुमंत मिसाळ, नितीन पाटोळे, गुरफान शेख, पवन ठाकूर, मनीषा गावकर, आयाप्पा नायडू, विक्रम ठाकुर दीपक कुलदीप यांनी मेहनत घेतली.