कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल

By अनिकेत घमंडी | Published: October 17, 2023 02:51 PM2023-10-17T14:51:02+5:302023-10-17T14:54:01+5:30

तिकीट तपासणीचे आयोजन करते.

4438 cases of ticketless travel detected in kalyan and 16 lakhs fine | कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल

कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीमुळे एकाच दिवसात विनातिकीट /अनधिकृत प्रवासाची एकूण 4438  प्रकरणे आढळून आली, ज्यामध्ये रु. 16.85  लाख  दंड वसूल करण्यात आला

मध्य रेल्वे, मुंबई विभातातर्फे सोमवारी कल्याण  रेल्वे स्थानकावर 167  तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन  अधिकारी श्री अरुण कुमार वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि श्री डग्लस मिनेझेस सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आणि 35  आरपीएफ कर्मचारी टीमने तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान, विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या 4438  प्रकरणांत दंड आकारण्यात आला आणि एका दिवसात रू. 16.85 लाख  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे वापरकर्त्यांसाठी आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करते.
 
आमच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या प्रामाणिक, समर्पित आणि वचनबद्ध कार्यामुळे आणि लहान मुले/अल्पवयीनांना वाचवण्याच्या अनेक प्रकरणांमुळे तसेच जीवन वाचवण्याच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. ज्यामुळे रेल्वेची अतिशय सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात मदत झाली आहे.
 
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करावा आणि सन्मानपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या।जनसंपर्क विभागाने।केले.

Web Title: 4438 cases of ticketless travel detected in kalyan and 16 lakhs fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.