४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार
By मुरलीधर भवार | Published: April 19, 2023 06:30 PM2023-04-19T18:30:40+5:302023-04-19T18:46:59+5:30
या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी ४५ कोटीच्या निविदा मागविल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया राबविताना काम करण्यास सक्षम नसलेल्या कंपन्या हे काम दिले आहे. जी कंपनी काम करण्यास सक्षम आहे. त्या कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाद केल्याचा गंभीर आारोप जयभारत कन्स्ट्रक्शन या कंपनीने केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या वतीने अमित चंदानी यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे.
महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्याच्या कामासाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ४५ कोटी रुपये खर्चाच्या होत्या. त्या ११ पार्टमध्ये होत्या. त्यापैकी सात निविदा ओपन केल्या. त्यामध्ये पाच कंपन्यांना काम दिले गेले. प्रथम निविदा तांत्रिक दृष्टय़ा ओपन करण्यात आल्या होत्या. ज्या कंपन्या काम करण्यास अपात्र आहे. त्यात कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या. त्यांना काम दिले गेले आहे. अवघ्या एका तासात फायनाशियल बीड ओपन करण्यात आले. हरकती घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्या करीता पुरेसा वेळ दिलेला नाही. सहभागी झालेल्या कंपनीपैकी एक व्यक्ति दोन कंपन्यांचा मालक आहे. केंद्राने टेंडर संदर्भात दिलेल्या निकषानुसार एकच व्यक्ती दोन कंपन्यांचा मालक असल्यास त्याला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. तो सहभागी झाल्यास तो बाद ठरु शकतो. केंद्राने दिलेल्या निकषांना सुद्धा निविदा प्रक्रिया पार पाडताना फाटा देण्यात आला आहे. या विविध मुद्यांकडे तक्रारदार चंदानी यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान यासंदर्भात शहर अभियंता अजरून अहिरे यांनी सांगितले की, चंदनी यांची तक्रार आामच्याकडे प्राप्त झालेली आहे. निविदा ओपन केल्या आहेत. मात्र संबंधित कंत्रट कंपन्याचे प्लांट आणि मशिनरी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आर्डर काढल्या आहेत. त्याची खात्री केल्याशिवाय काम दिले जाणार नाही.