भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू

By सचिन सागरे | Published: October 22, 2023 04:16 PM2023-10-22T16:16:11+5:302023-10-22T16:16:17+5:30

महावितरणच्या विजेच्या खांबा जवळील उघड्या केबल वायरचा शॉक लागल्याने या म्हशींचा मृत्यू झाला.

5 buffaloes died due to shock from open cable in Bhopar | भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू

भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू

डोंबिवली : पूर्वेकडील भोपर गावात रविवारी सकाळी चरण्यासाठी निघालेल्या 5 म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महावितरणच्या विजेच्या खांबा जवळील उघड्या केबल वायरचा शॉक लागल्याने या म्हशींचा मृत्यू झाला.

पूर्वेकडील भोपर गावात राहणारे गणेश पाटील यांच्या मालकीच्या या म्हशी आहेत. दूध विक्रीचा त्यांचा व्यवसाय असून या म्हशींवर त्यांचा उदरनिर्वाह होता. रविवारी सकाळी म्हशींना चरण्यासाठी घरातील गुराखी निघाला होता. वाटेत विजेच्या खांबाजवळ केबलची उघडी वायर पडली होती. या वायरीला म्हशी चिकटल्या आणि शॉक लागून त्या जागीच मरण पावल्या. त्यांना चरण्यासाठी नेणारा गुराखी हा थोडक्यात वाचला आहे.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात देखील नोंद करण्यात आली आहे. महावितरणने उघड्या केबल वायरचा त्वरीत बंदोबस्त केला पाहीजे. तसेच गणेश पाटील यांना भरपाई देखील मिळाली पाहीजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: 5 buffaloes died due to shock from open cable in Bhopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.