आदित्य ठाकरेच्या उपस्थितीत 5 माजी नगरसेवकांचा शिवसेनाप्रवेश, 17 वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:56 AM2022-02-18T09:56:02+5:302022-02-18T09:57:08+5:30
शिवसेनेचे युवानेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवलीतील विकासकामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यास आले होते
कल्याण/डोंबिवली - निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपल्या कक्षा वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली असून पालिका क्षेत्रातील हक्काच्या जागा स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. भाजप नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले जात असून दुसरीकडे आपले अस्तित्व टिकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे वेध लागले आहेत.
शिवसेनेचे युवानेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेकल्याण-डोंबिवलीतील विकासकामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यास आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवक रंजना पाटील त्यांचे पती नितीन पाटील, वृषाली जोशी त्यांचे पती रणजीत जोशी आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व नगरसेवकांनी आपण सेनेत प्रवेश करणार असल्याचे २४ तासापूर्वीच जाहीर केले होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे १७ माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात होते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आणखी भाजपचे दोन नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवक अशा ५ नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला असून स्वत:चे मतदार संघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर आणखी भाजपचे काही नगरसेवक देखील सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.