कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख 78 हजार लसीकरणाचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 09:50 PM2021-08-09T21:50:28+5:302021-08-09T21:51:00+5:30
खाजगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये एकुण 1 लाख 41 हजार 490 इतके लसीकरण झाले आहे.
कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर तसेच 18 वर्ष वयावरील नागरिकांचे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत 3 लाख 98 हजार इतके लसीकरण झाले असून महापालिकेने गत महिन्यात सुरु केलेल्या" Near To Home" म्हणजेच मोबाईल व्हॅनद्वारे झोपड्पट्टी व चाळ परिसरात केल्या जाणा-या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 38,482 इतके लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये एकुण 1 लाख 41 हजार 490 इतके लसीकरण झाले आहे.
शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या लस साठयानुसार नियोजन करुन महापालिकेच्या आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने गेले 6 महिने लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असल्यामुळे आत्तापर्यंत 5 लाख 78 हजार लसीकरणाचा फायदा महापालिकेच्या नागरिकांना झाला असल्याचा दावा केडीएमसीकडून करण्यात आला आहे.