कल्याण रेल्वे स्थानकात आढळले ५४ डिटोनेटर, घातपाताचा संशय
By अनिकेत घमंडी | Published: February 21, 2024 05:17 PM2024-02-21T17:17:53+5:302024-02-21T17:27:46+5:30
कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली.
कल्याण: कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनच्या जवळ एका बेवारस बॅगेमध्ये डिटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएस कडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये डिटोनेटर ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएसकडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये अंदाजे 54 डिटोनेटर (स्फोटके) मिळून आले आहेत. दरम्यान या घटनेचा पोलीस तपास सुरू असून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी गुन्हा दाखल होत असल्याचे सांगितले.