मुंबईसह ठाण्यातील ६० हजार शिक्षकांना मिळतील पीएफ स्लिप

By अनिकेत घमंडी | Published: September 27, 2023 02:42 PM2023-09-27T14:42:56+5:302023-09-27T14:43:32+5:30

अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी काढले आदेश

60 thousand teachers from Mumbai and Thane will get PF slips | मुंबईसह ठाण्यातील ६० हजार शिक्षकांना मिळतील पीएफ स्लिप

मुंबईसह ठाण्यातील ६० हजार शिक्षकांना मिळतील पीएफ स्लिप

googlenewsNext

डोंबिवली: अनेक वर्षांपासून न मिळालेल्या पीएफ च्या पावत्या देण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी काढले असून भाजपाचे  प्रदेश निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील ६० हजार शिक्षकांना याचा फायदा होणार असून शिक्षकांना पीएफ मध्ये जमा असलेल्या रकमेचा तपशील मिळणार आहे.

प्रत्येक महिन्याला शिक्षकांच्या खात्यातून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्रॉव्हिडेंट फंडात वळती केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यावर जिल्ह्याच्या भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक कार्यालयाकडून शिक्षकांना पीएफ च्या स्लिप देणे अपेक्षित असते मात्र अनेक शाळांमधील शिक्षकांना दोन, तीन चार ते सहा वर्षापर्यंत पीएफ च्या स्लिप मिळाल्या नसल्याच्या मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी  अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

अनिल बोरनारे यांनी याबाबत १५ सप्टेंबर रोजी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करून शिक्षकांना तातडीने पीएफ स्लिप देण्याची मागणी केली होती व याबाबत पाठपुरावा केला होता अखेर काल २६ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक आणि वेतन अधीक्षक तसेच ठाणे रायगड पालघर जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे  शिक्षण अधिकारी व वेतन अधिक्षक यांना आदेश देऊन शिक्षकांना तातडीने पीएफ स्लिप देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे

कुणाला मिळेल पीएफ स्लिप- खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जवळपास ६० हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 

पीएफ स्लिप चा फायदा काय- आपल्या प्रॉव्हिडेंट फंडात किती रक्कम आहे याचा तपशील मिळतो. पीएफ मधून आपल्याला घर दुरुस्ती, गृह कर्ज परतफेड, मेडिकल तसेच पाल्याच्या उच्च  शिक्षणासाठी व  लग्नासाठी ना परतावा रक्कम काढता येते.

Web Title: 60 thousand teachers from Mumbai and Thane will get PF slips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक