रन टू केअर मॅरेथॉन स्पर्धेत धावले ७०० डोंबिवलीकर; रोटरी बालोद्यानमध्ये ऑक्सिजन पुरवणारी वृक्ष आणि अद्ययावत खेळणी देणार

By अनिकेत घमंडी | Published: March 11, 2024 12:47 PM2024-03-11T12:47:08+5:302024-03-11T12:47:32+5:30

डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे भव्य अश्या रन टू केअर या मॅरेथॉन चे आयोजन रविवारी करण्यात आले ...

700 Dombivlikars ran in Run to Care Marathon; | रन टू केअर मॅरेथॉन स्पर्धेत धावले ७०० डोंबिवलीकर; रोटरी बालोद्यानमध्ये ऑक्सिजन पुरवणारी वृक्ष आणि अद्ययावत खेळणी देणार

रन टू केअर मॅरेथॉन स्पर्धेत धावले ७०० डोंबिवलीकर; रोटरी बालोद्यानमध्ये ऑक्सिजन पुरवणारी वृक्ष आणि अद्ययावत खेळणी देणार

डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे भव्य अश्या रन टू केअर या मॅरेथॉन चे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मॅरेथॉन मधून मिळणाऱ्या निधीतून उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा ह्या रोटरी बालोद्यान मध्ये देण्याचा क्लबचा मनोदय आहे. लहान मुलांना भरपूर ऑक्सिजन आणि खेळण्यासाठी उत्तम जागा, अद्ययावत खेळणी रन टू केअर या मॅरेथॉन द्वारे मिळालेल्या निधीतून उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी व्यक्त केला.

३ किमी, ५ किमी आणि १० किमी साठी झालेल्या मॅरेथॉन मध्ये ७०० पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. रनटूकेअर चे उदघाटन हे रोटरी जिल्हा स् ३१४२ चे प्रांतपाल रो मिलींद कुलकर्णी, एस.आर.पी.एफ. असिस्टंट कमांडंट राजेन्द्र वाघमारे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष रो. रघुनाथ लोटे ह्यांच्या हस्ते झेंडा दाखवून सकाळी सव्वा सहा वाजता झाले. उदघाटन प्रसंगी ए.जी. रो.शैलेश गुप्ते आणि रो.डी. एस. मनोज पाटील हे सुद्धा उपस्थित होते. पहिल्या तीन क्रमांकाना वय गटा नुसार पारितोषिके देण्यात आली.

मेडिकल टीम मधे डॉ विजय आगे, डॉ भक्ती लोटे, सचिव डॉ महेश पाटील व प्रोहिल चया डॉ माधवी ह्यांनी काम पाहिले. प्रकल्प संचालक रो आदिश मोने, प्रकल्पप्रमुख अजित शिरवळकर, प्रकल्प उपप्रमुख संतोष भणगे, ह्यांनी ह्या स्पर्धेचे उत्तम आयोजन केले होते. सचिन देखणे, अथर्वा जोशी, प्रमोद शेनवई, कमलाकर सावंत, कौस्तुभ कशेळकर, अक्षदा पवार सुबोध पटवर्धन, राजीव प्रभुणे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे क्लब चे जनसंपर्क संचालक मानस पिंगळे ह्यांनी सांगितले. 

Web Title: 700 Dombivlikars ran in Run to Care Marathon;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.