मराठी भाषा गौरव दिनी ८ वर्षाच्या मुलीने केला भैरवगडाचा उंच कडा सर

By मुरलीधर भवार | Published: February 27, 2023 05:01 PM2023-02-27T17:01:34+5:302023-02-27T17:06:14+5:30

मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो.

8 year old girl climbs Bhairavagad cliff on Marathi bhasha gaurav din | मराठी भाषा गौरव दिनी ८ वर्षाच्या मुलीने केला भैरवगडाचा उंच कडा सर

मराठी भाषा गौरव दिनी ८ वर्षाच्या मुलीने केला भैरवगडाचा उंच कडा सर

googlenewsNext

कल्याण - मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेल्या ग्रीहिता विचारे या आठ वर्षीय चिमुरडीने भैरवगडाचा कडा सर करत पुन्हा एकादा चांगली कामगिरी करत शहराचे नाव उंचावले आहे. भैरवगड म्हंटल तर किमान २ तासांची दमछाक, रॉक कट क्लायंबिंग आणि झिप लाइन या सर्व अडचणीवर मात करत ग्रीहिताने यशस्वी कामगिरी केली आहे.

मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो. किमान ३ हजार फुट उंच असलेला भैरवगड गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते.

ग्रीहिताच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे तिचे वडील सचिन विचारे ह्यांची देखील ग्रीहिताच्या कामगिरीला मोलाची साथ लाभली. या आधी ही ग्रीहिताने वजीर, नवरा-नवरी सुळके सर केले आहे. सोबत माऊंट एवरेस्टच्या बेस कॅम्पला जाणारी सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून तिची ओळख आहे.

ग्रीहिताला ही कामगिरी फत्ते करण्यासाठी तांत्रिक मदत करणारे महादुर्ग ऍडव्हेंचर चे भूषण पवार,सागर डोहळे, अक्षय जमदरे, नितेश पाटील, योगेश शेळके, विकी बुरकुले, कल्पेश बनोटे, ऋतुजा नेरकर आणि महाराष्ट्र रेंजरचे किशोर माळी यांची मोलाची साथ लाभली.

महादुर्ग ऍडव्हेंचर या साहसी संघाच्या सयंसेवकांना गिर्यारोहण क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव आणि तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असल्याने कुठे ही किंचतशी भीती या मुलांच्या मनात निर्माण होत नाही. त्यामुळे गिर्यारोहण सुरक्षित पार पडते, असे महादुर्ग ऍडव्हेंचरचे संस्थापक भूषण पवार यांनी सांगितले.


 

Web Title: 8 year old girl climbs Bhairavagad cliff on Marathi bhasha gaurav din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.