सर्पदंशामुळे कल्याणमधील एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Published: May 18, 2023 07:15 PM2023-05-18T19:15:03+5:302023-05-18T19:15:12+5:30

कल्याण - ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार ...

A 15-year-old boy in Kalyan dies due to snakebite | सर्पदंशामुळे कल्याणमधील एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

सर्पदंशामुळे कल्याणमधील एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

googlenewsNext

कल्याणज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. मुलावर योग्य ते उपचार करण्यात आले होते असे स्पष्ट केले आहे.

कोळसेवाडी परिसरातील सोनकर कुटुंबियांचे ज्यूसचे दुकान आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय अमित सोनकर हा दुकानात बसला असताना त्याला साप चावला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुक्मीणीबाई रुग्णलायात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला पुढील उपाचाराकरीता कळवा सरकारी रुग्णालयात पाठविले. उपचारा दरम्यान अमितचा मृत्यू झाला.

सोनकर कुटुंबियांचा आरोप आहे की, अमितला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी त्याला ग्लूकोज लावली गेली. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला कळवा रुग्णलायात नेले गेले. त्याचा काही उपयोग झाला नाही. चुकीचे उपचार केल्याने अमितचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूला महापालिका रुग्णालय जबाबदार आहे. याबाबत रुक्मीणी बाई हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टीके यांनी सांगितले की,वैद्यकीय उपचारात हलगर्जी पणाचा आरोप योग्य नाही. मुलावर योग्य ते उपचार करण्यात आले होते.

Web Title: A 15-year-old boy in Kalyan dies due to snakebite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.