कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल
By मुरलीधर भवार | Published: November 10, 2022 04:02 PM2022-11-10T16:02:14+5:302022-11-10T16:04:15+5:30
Kalyan Dombivali News: कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
- मुरलीधर भवार
कल्याण - शिवसेनेत फूट पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन केला आहे. शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आजही जोरदार इनकमिंग सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, कल्याण पश्चिमेतील माजी नगरसेवक गोरख जाधव यांच्यासह माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा पदाधिकारी योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता गिरी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. योगेश म्हात्रे यांचे खंदे समर्थक मुकेश भोईर यांनीही प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या गटाला कल्याण डोंबिवलीतील 5क् पेक्षा जास्त नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांच्या गटात सामिल झाल्याचे जाहिर केले होते.
काल शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिका:यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. त्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने योगेश म्हात्रे व त्यांच्या माजी नगरसेविका असलेल्या पत्नी पूजा यांनी प्रवेश केला आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे योगेश हे भाचे आहेत. माजी आमदार भोईर हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आहेत. योगेश यांनी सपत्नीक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन भोईर यांना एक प्रकारे घरचा आहेच दिला आहे.