शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप

By मुरलीधर भवार | Published: August 10, 2023 08:00 PM2023-08-10T20:00:22+5:302023-08-10T20:00:36+5:30

डोंबिवलीतील नामांकीत लोकांचा फोटो काढून ज्यांनी डोंबिवलीचे वाटोळे केले.

A big official of the Shinde group takes installments, so the problem of hawkers is not solved; Allegation of Raju Patil | शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप

शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप

googlenewsNext

डोंबिवली-डोंबिवलीतील शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो म्हणून डोंबिवलीतील फेरीवाल्यांची समस्या सूटत नाही. पोलिसांनी पूरावा मागितला. तर आम्ही पुरावे देऊ असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
चोळे गाव ठाकूर्ली येथील मनसेच्या शाखेचे उद्घाटन मनसे आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार पाटील यांनी उपरोक्त आरोप केला.

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत हायकोर्टाकडून केडीएमसी आयुक्तांना नोटिस बजावण्यात आली आहे. हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खड्डयामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जे दोन अ’डव्होकेट रस्त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहे. मला बोलविले तर त्यांना मी खरी परिस्थिती सांगणार. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्यावर गर्डर टाकण्याचे काम ज्याठीकाणी सुरु आहे. त्याठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश आहे. मात्र केडीएमसीआयुक्त कारवाई करीत नाही. कंट्रोल रुममधून बसून पैसे गोळा करण्याचे त्यांना सांगण्यात आले असल्याचाही आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

डोंबिलीतील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांंच्या समस्येमुळे डोंबिवली करांना नाहक त्रास होतो. हे फेरीवाले गुंडगिरी करुन नागरीकांना मारहाण करतात. मनसेने त्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर एक महिना फेरीवाले स्टेशन परिसरातील गायब होते. काही दिवसापूर्वी सोशल मिडियावर एक व्हीडीआे व्हायरल झाला होता. डोंबिवलीतील नामवंत लोकांच्या फोटोची विटंबना फेरीवाल्यांकडून केली जात असल्याचे दिसून आले. यावर काही नेत्यांनी टीका टिप्पणी केली. या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. ही शरमेची बाब आहे.

डोंबिवलीतील नामांकीत लोकांचा फोटो काढून ज्यांनी डोंबिवलीचे वाटोळे केले. त्यांचे फाेटो त्याठिकाणी लावले पााहिजे अशी टिका सत्ताधाऱ््यावर केले आहे. शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो त्यामुळे समस्या सूटत नाही. राहूल गांधी यांनी फ्लाईंक किस केल्याचा आरोप होत आहे. त्यांनी असे काही केले आम्ही काही पाहिले नाही त्यांनी मणिपूरचा जो मुद्दा उचलला याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. पक्षात जो कोणी येत नाही. त्यावर दबाव टाकला जातो. पूर्वीचे सरकार असो किंवा आत्ताचे सरकारकडून एक दडपशाही सुरु आहे. पक्षाच्या विरोधात बोलतो त्याला मारहाण केली जाते. आत्ता तर पत्रकारालाही मारहाण केली जात आहे. पत्रकारांनी जागे होऊन त्या पत्रकाराला न्याय दिला पाहिजे असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: A big official of the Shinde group takes installments, so the problem of hawkers is not solved; Allegation of Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.