डोंबिवली : दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत रंगणार पुस्तक आदान प्रदानचा सोहळा 

By अनिकेत घमंडी | Published: January 8, 2023 03:57 PM2023-01-08T15:57:04+5:302023-01-08T15:57:55+5:30

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दहा दिसव भरगच्च कार्यक्रम 

A book distribution ceremony will be held in the presence of eminent literary figures | डोंबिवली : दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत रंगणार पुस्तक आदान प्रदानचा सोहळा 

डोंबिवली : दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत रंगणार पुस्तक आदान प्रदानचा सोहळा 

Next

डोंबिवली : येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यावेळी दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करण्याचा संकल्प केला. २० ते २९ जानेवारी या कालावधीत ह.भ.प सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणात होणाऱ्या या सोहळ्याच्या शुभारंभाला साहित्यिक अच्युत गोडबोले, उमा कुलकर्णी, राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी वरील माहिती देताना सांगितले की, त्या सर्व परिसराला यंदा दिवंगत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याने ते सेल्फीसाठी आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. दहा दिवसांत माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सर्व उपक्रमात महापालिका देखील यंदा सहभागी झाली असून वाचाल तर वाचाल ही वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने आयुक्त चितळे यांनी या उपक्रमात महापालिका सढळ हस्ते सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी तातडीने वास्तू देऊन सहकार्याचा हात पुढे केला. मंत्री रवींद्र चव्हाण हे लायब्ररीच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतात. साहित्य टिकणे वाढीस लागणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा नात्याने ते नेहमीच मदत करतात, या सोहळ्याला देखील त्यांनी भरीव अर्थ सहाय्य केले असून महापालिका, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार हे या उपक्रमाचे सहआयोजक असल्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला मंत्री चव्हाण, महापालिका सिटी इंजिनियर रोहिणी लोकरे, विंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, गणेश मंदिर संस्थानाचे कार्यवाह प्रवीण दुधे, एम्स हॉस्पिटलचे प्रतिनिधी आदींसह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सभापती लोकसभा सुमित्रा महाजन, जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

कॉफी टेबल बुक यानिमित्त फ्रेंड्स लायब्ररी एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, आझादी के ७५ साल या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे. 

यानिमित्ताने शहरातील ३० हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच पै फ्रेंड्स लायब्ररी आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

Web Title: A book distribution ceremony will be held in the presence of eminent literary figures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.