कल्याणच्या कराटे खेळाडूंची चमकदार कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले आठ सुवर्ण पदक
By सचिन सागरे | Published: October 5, 2023 04:57 PM2023-10-05T16:57:05+5:302023-10-05T16:57:45+5:30
अंधेरी येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानसह भूटान, नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका येथील सुमारे पंधराशे कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
कल्याण : कॉम्बॅक्ट्स मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आठ सुवर्ण पदकास गवसणी घातली आहे. काता प्रकारात सारंग पवार, सोहम पाटणे, आयुष अडेकर, मंजिरी कुतरवाडे, चेतना साळुंके आणि कुमिते प्रकारात गौरव तारी, ओम कांबळे, आणि श्रेयस पाटील यांनी सुवर्ण पदक पटकावले.
अंधेरी येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानसह भूटान, नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका येथील सुमारे पंधराशे कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कल्याणच्या मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या क्लबच्या स्पर्धकांनी काता आणि कुमिते यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
काता प्रकारात रौप्य पदक विजेते किशोर जयशंकर, सुमेध गायकवाड, ओम कांबळे, गौरवी तारी, पारस म्हात्रे, अर्णव यादव. कांस्य पदक विजेते आशिष सहेजराव, आदित्य घानेकर, अंजली गुप्ता, हिमांशु खंडारे, वेद घावरे, आरव बोरेकर, कौस्तुभ चौधरी, श्रेयस पाटील, नैनेश गौर, केतकी सरोदे, प्रांजल कुतरवाडे हे आहेत.
कुमिते प्रकारात कांस्य पदक विजेते चेतना साळुंके, मंजिरी कुतरवाडे, हिमांशू खंडारे, पारस म्हात्रे, अर्णव यादव, आयुष अडेकर, सोहम पाटणे हे आहेत. या सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सेन्साई महेश चिखलकर व आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.