कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Published: September 28, 2022 01:52 PM2022-09-28T13:52:24+5:302022-09-28T13:53:47+5:30

KDMC News: बनावट कागदपत्रंच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणा-या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

A case has been filed against 27 builders in Kalyan-Dembivli | कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल

कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल

Next

- मुरलीधर भवार
कल्याण - बनावट कागदपत्रंच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणा:या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. चौकशी अंती केडीएमसीने पोलिस तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत सर्रापणो बेकायदा बांधकामे सुरु आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारले आहे. महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. तरीही बेकायदा बांधकामे सुरु आहेत. काही महिन्यापूर्वी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी तत्कालीन आयुक्त विजय सूर्यंवशी यांच्याकडे तक्रार केली हाेती. या प्रकरणी चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्याचबराेबर त्यांनी या प्रकरणात  उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. तसेच त्यांनी ही माहिती अधिकारात हे प्रकरण उघडकीस आणले. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाल्यावर त्यांनी हीच माहिती न्यायालयात सादर केली आहे.  त्यानंतर महापालिकेने या बिल्डरांच्या विराेधात फास आवळण्यास सुरुवात केली हाेती.

महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील या प्रकरणात पुढाकार घेऊन नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. नगररचना अधिकारी अतुल पानसरे यांच्या तक्रारीवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा केला आहे. 
महापालिका अधिका:यांचा खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट रेराकडून 67 सर्टिर्फिकेट मिळविले आहेत. महापालिकेस रेराची ही फसवणूक केली आहे. कल्याण ग्रामीण 27 गावात 26 तर डोंबिवलीत 39 परवानग्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या एकूण 68 परवानग्या पोस्ट डॉक्यूमेंट तयार करुन दिल्याचे भासविले आहे. त्या आधारे रेराकडे नोंदणी केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. रेरा आणि महापालिकेत समन्वय असावा. यासाठी रेराठी महापालिकेने लिंक दिली आहे. त्याची शहानिशा करुन रेराने सर्टिर्फिकेट द्यावे असे रेराला सांगण्यात आले आहे.

Web Title: A case has been filed against 27 builders in Kalyan-Dembivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.