उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल 

By सदानंद नाईक | Published: July 19, 2024 03:14 PM2024-07-19T15:14:13+5:302024-07-19T15:14:30+5:30

महापालिका अधिकारी व कामगार आमने-सामने?

A case was registered against the labor leader after the complaint of the Additional Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation  | उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल 

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल 

उल्हासनगर : महापालिका मुख्यालयात विनापरवाना व बळजबरीने कामगारांना बोलावून आंदोलन करीत अधिकाऱ्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रकार कामगार नेता राधाकृष्ण साठे यांनी केला. अशी तक्रार पोलीस ठाण्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केल्यावर पोलिसांनी साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने अधिकारी व कामगार आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

उल्हासनगर महापालिकेत भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ही संघटना कार्यरत असून संघटनेच्या शहर युनिटचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे आहेत. साठे यांनी कंगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी यशस्वी आंदोलन केली. काही कामगारांच्या समस्या बाबत त्यांनी ९ जुलै रोजी दुपारी साडे चार वाजता विनापरवाना मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर, पुढच्या वेळी संडासाचे रेबीट घेऊन येऊन, अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार असल्याचे यावेळी साठे यांनी सांगितले. तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त व सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांच्यावर आरोप करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

 महापालिका कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी ९ जुलै दुपारी साडे चार वाजता महापालिका मुख्यालयात विनापरवाना केलेले आंदोलन व सोशल मीडियावर बदनामीकारक व्हायरल केलेले व्हिडीओ याबाबत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आक्षेप घेतला. लेंगरेकर यांनी मुख्यालयात कामगार नेत्याने केलेला प्रकार आयुक्त अजीज शेख यांच्या कानावर घातला. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास संमती देताच, लेंगरेकर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून कामगार नेते साठे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी साठे यांच्या विरोधात गुरवारी गुन्हा दाखल केला. मध्यवर्ती पोलिसांनी राधाकृष्ण साठे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस कामगार नेते राधाकृष्ण साठे यांचा शोध घेत असून साठे यांच्यासी संपर्क केला असता, झाला नाही. याप्रकाराने महापालिका अधिकारी व कामगार आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: A case was registered against the labor leader after the complaint of the Additional Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.