मध्यवर्ती रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढला अर्धा किलोचा गोळा
By सदानंद नाईक | Published: November 29, 2023 04:52 PM2023-11-29T16:52:21+5:302023-11-29T16:55:06+5:30
रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी डॉ तृप्ती रोकडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे.
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा पाण्याचा गोळा काढून डॉक्टरांनी जीवदान दिले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी डॉ तृप्ती रोकडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा पोटात गेल्या तीन महिन्यापासून दुखत असल्याने, महिलेने सुरवातीला दुखणे अंगावर काढून स्थानिक डॉक्टरांकडून औषधोउपचार केले. मात्र दुखणे बसण्या ऐवजी वाढल्याने, महिला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाली. डॉ तृप्ती रोकडे यांनी महिलेची तपासणी व सोनोग्राफी केली असता, पोटात गाठ आढळून आली.
डॉ रोकडे यांच्या टीमने तीन टाक्याची दुर्बिणीद्वारे दोन तास शस्त्रक्रिया करून अर्धा किलो वजनाच्या पाण्याची गाठ यशस्वीपणे बाहेर काढून महिलेला जीवदान देण्यात आले. महिला शस्त्रक्रियानंतर ठणठणीत असून काहीएक त्रास होणार नसल्याची प्रतिक्रिया डॉ रोकडे यांनी दिली. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी या शास्त्रक्रियेबाबत डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे.
"रुग्णालय बदल राहा है"
मध्यवर्ती रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून २०० बेड क्षमतेच्या रुग्णालयात दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या दुपट्ट वाढली असतांना व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींची संख्या कमी असतांनाही रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविली जात आहे. रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. मनोहर बनसोडे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी विविध उपक्रम राबविले जात आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाने अर्धा किलो वजनाचे कमी महिन्याचे बाळ वाचविले असून मोठ्या शस्त्रक्रियाचे प्रमाण वाढले आहे. डॉ बनसोडे यांनी रुग्णालय बदल रहा है अशी प्रतिक्रिया देऊन आदिवासी, गरीब, गरजू रुग्णांचे हक्काचे रुग्णालय झाल्याचे सांगितले. शासनाने इतर रूग्णालया प्रमाणे सुखसुविधा पुरविल्यास व राजकीय नेत्यांनी त्याबाबत पाठपुरावा केल्यास, जिल्ह्यात रुग्णालय नंबर एकवर राहणार असल्याचे डॉ बनसोडे म्हणाले.