कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी

By मुरलीधर भवार | Published: December 17, 2022 11:58 PM2022-12-17T23:58:09+5:302022-12-17T23:59:16+5:30

साडे ५ हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली. तर यावेळी तब्बल २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली.

A huge crowd of young people at Kalyan's Maha Rozgar Melavaya | कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी

कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी

Next

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी तुफान गर्दी केली. साडे ५ हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली. तर यावेळी तब्बल २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उमेदवारांना नौकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तरुण आणि उपस्थितांशी संवाद साधला.

या रोजगार मेळाव्यात १०० कंपन्या रोजगाराची संधी घेऊन आपल्या दाराशी आल्या आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगार मेळाव्यात त्वरित नोकरी मिळणार असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजनेअंतर्गत ३५ कोटी पेक्षा जास्त निधीचे वितरण विविध माध्यमातून केले गेले आहे. त्यातून अनेक नवीन उद्योजक तयार होणार आहेत. ७५० हुन अधिक उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याण कार्यक्रम योजनेअंतर्ग ५ हजार लाभार्थी पत्र ठरले असून त्यांना त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १ हजार ७०० लाभार्थी मिळाले असून त्यांना महिन्याला एक हजार अनुदान मिळणार आहे, असेही डॉ. शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. अगोदर अडीच वर्षे आराम होता. आता मंत्रायलयात गाऱ्हाणे ऐकली जात आहेत. हे सरकार काम करत आहे असेही डॉ. शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. आज एक वेगळे चित्र राज्यात दिसत असून एकीकडे लोकांना वेठीला धरून मोर्चा निघत आहे आणि दुसरीकडे आपण रोजगार देण्याचं काम करत असल्याचे सांगत डॉ. शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्च्यावर टीका केली.

या मेळाव्यामध्ये क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड, एएससीआयआय प्रा. लि., स्टेल्थ हेल्थ मॅनेजमेंट, रिलायबल लॅब्स, घार्डा केमिकल्स, हॉकीन्स कुकर्स, पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, आदिश कन्सलटन्सी, इंडो अमाईन्स, रिलायबल एचयूबी इंजिनिअरीग (इंडिया), पितांबरी प्रॉडक्टस्, भारत गिअर्स, सुयश ग्लोबल, सँडस् सिनर्जी, पुरोहीत टेक्सटाईल अँड प्रॉडक्टस्, प्रोमोज इंजिनिअरींग, जेड रबर प्रॉडक्ट, कल्पवृक्ष, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, बीईडब्ल्यू इंजिनिअरींग, मार्करीच ॲप्रल, नेक्सजी ॲप्रल एलएलपी आदी विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

नववी, दहावी, ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट, आयटीआय, इंजिरिअरिंग इत्यादी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफीस जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफीसर, सेल्स ऑफीसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारची एकुण १३ हजार १०९ रिक्तपदे उपलब्ध होती.

या मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून साडे ५ हजारांहून अधिक तरुणांनी हजेरी लावली. यात १ हजार १०० तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. तर मेळाव्याच्या ठिकाणी २ हजार ६३१ तरुणांनी नोंदणी केली. यावेळी २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्र देण्यात आली. आर्थिक महामंडळ स्वयंरोजगार संस्था यांच्या काउंटरवर ४ हजार ६६७ नोंदणी करण्यात आल्या.

 स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग
मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी झाली होती. यामध्ये अण्णाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश होता.महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली .

Web Title: A huge crowd of young people at Kalyan's Maha Rozgar Melavaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण