सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याणमध्ये मोर्चा

By सचिन सागरे | Published: June 20, 2023 07:45 PM2023-06-20T19:45:43+5:302023-06-20T19:45:58+5:30

जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीनं देशद्रोही जाहीर करा यासारख्या आग्रही मागण्या करण्यात आल्या होत्या.

A march in welfare on behalf of the entire Indian society | सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याणमध्ये मोर्चा

सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याणमध्ये मोर्चा

googlenewsNext

कल्याण : दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या मनात शासनाविरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याणमध्ये सकल भारतीय समाजाच्या वतीने मंगळवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्या, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीनं देशद्रोही जाहीर करा यासारख्या आग्रही मागण्या करण्यात आल्या होत्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा मार्गे प्रांत कार्यालयात जाऊन धडकला. यावेळी, शिष्ट मंडळाने प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

या मोर्च्यात कामगार नेते शाम गायकवाड,  राजाराम पाटील, सुरेश पाटील, आगरी सेनेचे चंद्रकांत ठाणकर, ॲड. किरण चन्ने, बाळाराम कराळे, ॲड. जय गायकवाड, अजिंठा फाउंडेशनचे अजय सावंत, सुबोध मोरे, अण्णा रोकडे, भीमराव डोळस, बाबा रामटेके,   अण्णा पंडित, राजू रणदिवे, संदीप जाधव, महेंद्र गायकवाड आदींसह ठाणे, रायगड जिल्ह्यामधील अनेक बौद्ध, आगरी, कोळी बांधव उपस्थित होते.

Web Title: A march in welfare on behalf of the entire Indian society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.