पाणी आणि रस्ते समस्येवर पार पडली बैठक; दोन्ही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले
By मुरलीधर भवार | Published: January 28, 2023 07:09 PM2023-01-28T19:09:56+5:302023-01-28T19:10:47+5:30
शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली.
डोंबिवली-शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली.
यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी भाजचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीस कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण वाघमारे आणि रोहिणी लोकरे हे देखील उपस्थित होते.
गरीबाचा वाडा आणि राजूनगरात पाण्याची समस्या आहे. त्याठिकाणी जलवाहिनी टाकण्याकरीता निधी मंजूर आहे. तरी देखील ते काम केले जात नसल्याची बाब माजी सभापती म्हात्रे यांनी उपस्थित केली. त्याचबरोबर दोन्ही प्रभागात मोबाईल कंपन्यांनी त्यांची सेवा वाहिनी टाकण्याकरीता रस्ते खोदले आहे. त्याठिकाणी खोदलेला रस्ता नीट केलेला नाही. याकडे म्हात्रे यांनी मंत्र्यासह आयुक्तांचे लक्ष वेधले. या दोन्ही विषयावर सकारात्मक चर्चा होऊन हे दोन्ही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.