उल्हास नदी जलपर्णी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

By मुरलीधर भवार | Published: March 7, 2023 04:30 PM2023-03-07T16:30:23+5:302023-03-07T16:30:57+5:30

उल्हास नदी प्रदूषणामुळे नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे.

A meeting was held with the district collector for the demand of removal of Ulhas river waterfowl | उल्हास नदी जलपर्णी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

उल्हास नदी जलपर्णी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

googlenewsNext

कल्याण-उल्हास नदी प्रदूषणामुळे नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे. ही जलपर्णी हटविण्याकरीता ठाेस उपाय याेजना करण्यात यावी या मागणीसाठी काल साेमवारी मी कल्याणकर संस्थेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी अशाेक शिंगारे यांची भेट घेण्यात आली.

नदी प्रदूषण राेखण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणारे आणि नदी पात्रात उपाेषण करणारे मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांच्या पुढाकारात माजी नगरसेवक महेश गायकवाड, कैलास शिंदे आणि उमेश बाेरगांवकर यांनी काल जिल्हाधिकारी शिंगारे यांची भेट घेतली. नदीच्या पात्रात उगविलेली जलपर्णी हटविण्याची मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी शिंगारे यांच्याकडे करण्यात आली. नदी पात्रात हाेत असलेले प्रदूषण राेखण्याची मागणी केली. ही बैठक कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यातून घेण्यात आली. उल्हास नदी बारमाही असून सगळयात माेठा जल उद्भव आहे.

ताे प्रदूषण मुक्त असावा. नदीच्या पात्रात प्रक्रिया न करता साेडले जाणारे सांडपाणी आणि रासायनिक पाणी बंद केले जावे. त्याचबराेबर नदी स्वच्छतेचा कायर्क्रम हाती घेतला जावा. हर्बल फवारणीमुळे चांगला परिमाण साधला गेलेला नाही. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने जलपर्णी हटविली जावी. उल्हास नदी पात्रात कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील गाळेगाव आणि माेहने नाला वळविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र म्हारळ नाल्याचा प्रश्न हा महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रखडला आहे. ताे मार्गी लावण्यात यावा. भिवंडी येथील कामवारी नदीतील जलपर्णी हटविण्याचा विषय विधी मंडळात लाेकप्रतिनिधींनी उपस्थित केला हाेता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध नदी पात्रात उगविलेली जलपर्णी ही हर्बल फवारणी करुन दूर केली जाईल.

मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले असले तरी यांत्रिक पद्धतीने जलपर्णी दूर करावी. त्याचबराेबर नदी पात्रात प्रक्रिया न करता साेडले जाणारे सांडपाणी बंद करावे. तसेच रासायनिक कारखान्यांना प्रक्रियेशिवाय सांडपाणी न साेडण्याची सक्ती करावी. तसेच असे केल्यास त्यांच्या विराेधात पर्यावरण कायद्यान्वये कारवाईक जावी. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध नद्यांच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष हाेत आहे. प्रदूषण करणाऱ्यांच्या विराेधात त्यांच्याकडून ठाेस कारवाई केली जात नाही याकडेही निकम यानी लक्ष वेधले आहे.

Web Title: A meeting was held with the district collector for the demand of removal of Ulhas river waterfowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे