मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्धेच्या हत्येचे फुटले बिंग; अवघ्या आठ तासाच पोलिसांनी केली आरोपीला अटक
By मुरलीधर भवार | Published: June 15, 2024 07:56 PM2024-06-15T19:56:48+5:302024-06-15T19:57:05+5:30
डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास या इमारतीमधील सदनिकेत राहणाऱ््या आशा रायकर या वृद्ध महिलेचे दार बाहेरुन बंद होते.
कल्याण-मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्ध महिलेची हत्या करणाऱ््या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासाच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव यश सतिष विचारे असे आहे. त्याला दारु आणि जुगाराचे व्यसन आहे. त्यातूनच त्याने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास या इमारतीमधील सदनिकेत राहणाऱ््या आशा रायकर या वृद्ध महिलेचे दार बाहेरुन बंद होते. शेजाऱ््यानी दार उघडून आत प्रवेश केला असता त्याठिकाणी घरात आशा यांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती शेजाऱ््यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी विष्णूनगर पोलिसांनी धाव घेतली. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ ापेलिस निरिक्षक संजय पवार यांच्या पथकाने तपास सुरु केला. आशा यांची हत्या दुपारच्या सुमारास झाली असल्याने इमारतीत बाहेरून कोणी आले नसल्याचे सीसीटीव्हीच्या तपासणीत आढळून आले. पोलिस सीसीटीव्ही तपास होते. तेव्हा त्यांच्यासोबत सीसीटीव्ही तपासण्याच्या कामात आरोपी यश हा मदत करीत होतात. यश हा त्याच इमारतीत राहणारा आहे. त्याला पोलिसांनी विचारणा केली की, तू कुठे होता. तेव्हा त्याने तो माणकोली येथे गेलो होतो असे सांगितले. पोलिसांना तो देत असलेली माहिती ही विसंगत असल्याचे आढळून आली. पोलिसांनी इमारतीमधील अन्य तरुणांचीही चौकशी केली. त्यातून पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी आरोपी यशला बेड्या ठोकल्या. यश हा काही कामधंदा करीत नाहीत. त्याला दारु आणि जुगाराचे व्यसन आहे. त्याला आई आहे. त्याचा भाऊ यूकेला आहे. यश हा आ’नलाईन जुगारात ६० हजार रुपये हरला होता. त्याच्यावर ६० हजार रुपयांचे कर्ज झाले होते. त्याला पैशाची गरज होती. त्याने मित्राला मेसेज केला होता. चल यार दारु पिते है. कल जमा होना पडेंगा. या मेसेज विषयी मित्राने पोलिसांना माहिती दिली होती. इमारतीच्या लिफ्ट जवळ तो उभा हाेता. त्याने आशा यांना घरात जाताना पाहिले. आशा यांच्या गळ्यात आणि कानात सोन्याचे दागिने होते. ते पाहून त्याची नियत फिरली.
तो त्यांच्या मागे गेला. त्याने त्यांच्याकडे पिण्यसाठी पाणी मागितले. त्या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा त्याने घरात प्रवेश केला. आशा यांची परकरच्या नाडीने गळा आवळून हत्या केली. त्यांच्या अंगावरील दागिने काढले. ते सोनाराकडे विकले. त्यातून त्याला पैसे मिळाले. त्यानंतर त्याने मित्रासोबत दारु पार्टीचा बेत आखला. त्याला मेसेज केला.आशा या कामगार रुग्णालयातून सेवा निवृत्त झाल्या होत्या. त्यांची एक मुलगी विरारला राहते. आशा एकटी राहत असल्याच्या संधीचा फायदा आरोपीने घेतला.