डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

By मुरलीधर भवार | Published: August 22, 2023 05:54 PM2023-08-22T17:54:06+5:302023-08-22T17:54:26+5:30

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात.

A plan to de-congest the traffic jams in Dombivli is ready | डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

googlenewsNext

डोंबिवली- ठाणे डोंबिवलीला जोडणारा डोंबिवली खाडीवरील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली हा या पूल बांधून तयार असून तो लवकर वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. मात्र या पूलामुळे डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडी होईल. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी डी कंजेक्शनचा प्लान तयार करण्यात आला असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

वाहतूक कोंडीवर हा डी कंजेक्शन प्लान तयार करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डा’. भाऊसाहेब दांगडे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून त्याचे नियाेजन केले आहे. दीवा वसई मार्गावरील मोठा गाव ठाकूर्ली येथे रेल्वे फाटक आहे. हे फाटक बंद होणार आहे. त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपूलाचे काम येत्या दिवाळीत सुरु केले जाईल. या उड्डाणपूलाचे सात आठ महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. त्याच्या भूसंपानाकरीता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लवकर मार्गी लागणार आहे.
त्याचबरोबर मोठा गाव ठाकूर्ली -माणकोली खाडी पूलाजवळून कल्याण रिंग रोड जात आहे. मोठा गाव ठाकूर्ली ते कल्याण दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ््या टप्प्याच्या कामाची निविदा एमएमआरडीएने प्रसिद्ध केले आहे. निविदा मंजूर होऊन होता. या रिंग रोडच्या तिसऱ््या टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे. याशिवा मोठा गाव ठाकू्र्ली ते कोपर हा १८ मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता एमएमआरडीएकडून केला जात आहे. त्याला निधी मंजूर आहे.

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. या विविध उपाययोजना करण्यात आल्या असून खाडी पूल खुला होण्यापूर्वीच पूलामुळे डोंबिवली पश्चिमेत वाहतूक कोंडीचा सामना कराव लागू शकतो अशी आवई विरोधकांकडून उठविली जात आहे. त्याचे म्हात्रे यांनी खंडन करीत डी कंजेक्शन प्लान हा वाहतूक कोंडीवर तोडगा असल्याचे स्पष्ट केले आहे. खाडी पूल करताना त्याठिकाणी पूलाखालीन जलवाहतूक करता येण्या इतके अंतर सोडण्यात आले आहे. भविष्यात कल्याण ते ठाणे हा जलवाहतूकीचा मार्ग सुरु होणार आहे. त्यासाठी ही उपाययोजना आधीच करण्यात आली आहे याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: A plan to de-congest the traffic jams in Dombivli is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.