कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

By अनिकेत घमंडी | Published: August 24, 2022 06:53 PM2022-08-24T18:53:16+5:302022-08-24T18:54:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे.

A simple local restore will be performed instead of the AC in the key; Railway administration's assurance | कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

कळव्यातील AC ऐवजी साध्या लोकल पूर्ववत होणार; रेल्वे प्रशासनाचं आश्वासन

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून साध्या लोकल बंद करून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याची दखल घेत  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांचीभेट घेत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत एसीऐवजी साध्या लोकल रेल्वे प्रशासनपूर्ववत करेल, असे आश्वासन यावेळी लाहोटी यांनी दिले.  याप्रसंगी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, शिवसेनेचे नेते आणि प्रवासी संघटनेचेपदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसूनआले आहे. या प्रकारामुळे सुरूवातीला कळवा आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले. गर्दीच्या वेळी एक साधी लोकलएसी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येत नाही. त्यांना त्यामागच्या असलेल्या गर्दीच्या लोकलमध्ये शिरून प्रवासकरावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहे. प्रवाशांचा या संतापाचे उद्रेकात रूपांतर होण्यापूर्वी प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच गर्दीच्या वेळी सुरू असलेल्याकोणत्याही सध्या लोकल बंद करू नये. त्याचा प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम होईल, अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी यावेळी मांडली. त्यामुळे ज्यासाध्या लोकल बंद केल्या आहेत त्या पूर्ववत कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली. सोबतच लोकल सुरू करत असताना पूर्णलोकल एसी करण्यापेक्षा एका लोकलमध्ये निम्मे डब्बे साधे आणि निम्मे डब्बे एसी करता येतील का याचीही चाचपणी करावी, अशी सूचना यावेळी शिंदेंनीकेली. एसी लोकलचे भाडे कमी करून प्रवाशांना प्रोत्साहन द्या, अशीही सूचना यावेळी त्यांनी यात कळवा कारशेडमधून निघणारी लोकल कळवा स्थानकात थांबवावी, यावर चर्चा झाली. बदलापूर  रेल्वे स्थानकात सुरू  असलेल्या होमप्लॅटफॉर्मचे काम तातडीने पूर्ण करावे, कल्याण स्थानकात पूर्व भागात लोकग्रामच्या दिशेने तिकीट घराजवळ स्वयंचलित जिना आणिस्वच्छतागृह उभारावे, डोंबिवली स्थानकातील स्वच्छता या मागणीचा समावेश होता. यावेळी उपस्थित प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी दिवास्थानकात फेस्टिव्हल स्पेशल मेल - एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळण्यासाठी फलाट क्रमांक सात आणि आठची रुंदी किमान २२ डब्यांपर्यंतवाढवावी ही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, असे लाहोटी म्हणाले. 

कळवा मुंब्रा येथील प्रवाशांच्या याच अडचणींसंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मंगळवारी डीआरएम गोयल यांची भेट घेत जर समस्या सुटल्या नाही तर मात्र जन आंदोलन पेटेल, त्याची जबाबदारी रेल्वेची राहील असा जाहीर इशारा दिला.

Web Title: A simple local restore will be performed instead of the AC in the key; Railway administration's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.