कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये साप शिरला
By सचिन सागरे | Published: May 30, 2024 08:32 PM2024-05-30T20:32:06+5:302024-05-30T20:32:46+5:30
बदलत्या वातावरणामुळे व अवेळी होत असलेल्या पावसामुळे मानवी वस्तीमध्ये ठीकठिकाणी साप निघत आहेत.
कल्याण : बदलत्या वातावरणामुळे व अवेळी होत असलेल्या पावसामुळे मानवी वस्तीमध्ये ठीकठिकाणी साप निघत आहेत. अशीच घटना कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये घडली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर साप निघाल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. तेव्हा त्यांनी वॉर फॉउंडेशनचे प्राणी मित्र सतीश बोबडे ह्यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी प्राणीमित्र तन्मय माने व साहस बोबडे ह्यांच्यासोबत हॉस्पिटलला जाऊन सापाचा सुखरूप बचाव केला.
पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी साप असून त्याच्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशी माहिती बोबडे यांनी दिली. सदर साप हा लवकरच योग्यती वैद्यकीय तपासणी करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग मुक्त करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.