१८व्या मजल्यावर अडकलेल्या भटक्या कुत्र्याची ४८ तासानंतर 'पॉज'ने केली सुटका
By मुरलीधर भवार | Published: March 5, 2024 09:58 PM2024-03-05T21:58:27+5:302024-03-05T21:58:58+5:30
प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) ने वेळेवर केली मदत
मुरलीधर भवार, कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील गांधारी येथील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील डकमध्ये एक भटका कुत्रा अडकून पडला हाेता. ४८ तासानंतर या भटक्या कुत्र्याची सुटका पॉज या प्राणीमित्र संघटनेच्या वतीने सुटका करण्यात आली आहे.
याबाबत प्लांट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पॉजचे प्रमुख निलेश भणगे यांनी माहिती दिली की, गांधारी येथील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील डकमध्ये एक कुत्रा अडकून पडल्याची माहिती मिळाली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या श्वान पथकाला ही माहिती दिली. त्याठिकाणी श्वान पथकाचे कर्मचारी त्याठिकाणी पाेहचले. त्यांनी या भटक्या कुत्र्याला त्याठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो कुत्रा त्यांना चावला. त्यामुळे श्वान पथकाने त्याला बाहेर काढण्या ऐवजी त्याठिकाणाहून निघून जाणे पसंत केले. हा कुत्रा उपाशी असल्याने तो प्रचंड रित्या भुंकत होता. त्याला इमारतीमधील नागरीकांनी जेवण दिले तेव्हा त्यांचे भूंकणे बंद झाले. मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी पॉज या संस्थेची तज्ञ टिममधील कार्यकर्ते देवेंद्र निलाखे आणि जयश्री काळे यांनी इमारतीचा १८ वा मजला गाठला. कॅचर टाकून या कुत्र्याला त्यांनी पकडले. त्याला बाहेर काढले. त्याला आत्ता सोडून देण्यात आले आहे. पॉजने भटक्या कुत्र्याचा जीव वाचला.