नेवाळी येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण

By अनिकेत घमंडी | Published: September 14, 2022 05:05 PM2022-09-14T17:05:17+5:302022-09-14T17:05:47+5:30

सोमनाथ जाधव याने पंधरा दिवसापूर्वी दिलेली सर्व्हिस वायर जळाल्याची तक्रार करत तंत्रज्ञ तळपाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

A technician of Mahavitaran was brutally beaten in Newali | नेवाळी येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण

नेवाळी येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण

Next

डोंबिवली - नेवाळी नाका येथे महावितरणच्या तंत्रज्ञाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. यात तंत्रज्ञाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महावितरणने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली. सोमनाथ नाथा जाधव राहणार नेवाळी पाडा, ता. अंबरनाथ असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हाजीमंलग शाखा कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे हे मंगळवारी सकाळी नेवाळी नाका येथील कल्याण रोडवरील रोहित्राला फ्यूज टाकण्याचे काम करत होते. 

आरोपी सोमनाथ जाधव याने पंधरा दिवसापूर्वी दिलेली सर्व्हिस वायर जळाल्याची तक्रार करत तंत्रज्ञ तळपाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने लाथाबुक्क्यासह धातुच्या टणक वस्तुने तंत्रज्ञ तळपाडे यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे तंत्रज्ञ तळपाडे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तळपाडे यांच्या फिर्यादीवरून हिल लाईन पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जीवघेणा हल्ला, शिवीगाळ व दमदाटी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक श्रीराम पडवळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत. कर्तव्यावरील वीज कर्मचारी व कामगारांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
 

Web Title: A technician of Mahavitaran was brutally beaten in Newali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.