एटीएममधून नागरीकांचे पैसे काढणारा चोरटा गजाआड
By मुरलीधर भवार | Published: April 15, 2024 08:30 PM2024-04-15T20:30:22+5:302024-04-15T20:31:37+5:30
महात्मा फुले पोलिसांनी केली अटक, साथीदाराचा शोध सुरु.
कल्याण- एटीएम सेंटरमध्ये येणाऱ््या सर्व ग्राहकांचे पीन नंबर आणि एटीएम घेऊन अनेकांना लूटणाऱ््या सराईत चोरटा दीपक झा याला कल्याणच्या महतामा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात त्याने १६ जणांना लक्ष्य केले आहे. त्याच्याकडून विविध ब’ंकांचे ९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दीपक झा याने एका साथीदाराच्या मदतीने किती लोकांना गंडा घातला असेल याचा अंदाज लागू शकतो.
काही दिवसापूर्वी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार केली. त्या दोघींची तक्रार एकच होती. त्या दोघी कल्याण मधील एका एटीएम सेंटरमध्ये गेल्या. त्यांनी सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पैसे एटीएममधून निघाले नाही. त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला. त्यानेही प्रयत्न केला. पैसे निघाले नाही. थाेड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलैश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपास सुरु असतानाच पोलिसांकडे या प्रकरणी १६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांकडे सीसीटीव्ही होता. त्या सीसीटीव्हीत दोन तरुण कैद झाले होते. अखेर त्या पैकी एक दीपक झा याला पोलिसानी उल्हासनगरातून अटक केली. पोलिसांकडून त्याचा दुसऱ््यासाथीदाराचा शोध सुरु आहे. दीपक झा याच्याकडून विविध ब’ंकांची ९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दीपक झा याच्या गुन्ह्याची पद्धत अशी होती की, एटीएम बाहेर उभा राहायचा. स्टेशन परिसरात एटीएम सेंटरमध्ये येतात. अनेक जण असे असतात. ज्यांना एटीएम आ’परेट करता येत नाही. त्याची माहिती नसते. अशा ग्राहकांना एटीएममध्ये पैसे काढण्यास जात त्यांना मदतीच्या नावाखाली दीपक झा आणि त्याचा साथीदार आत यायचे. पीन ंनंबर काय टाकला जात आहे. ते पाहून घ्यायचे. नंतर आतमध्ये जायचे हातचलाखी करुन एटीएम बदलून टाकायचे. ड्प्लीकेट एटीएम कार्ड ग्राहकांच्या हाती टेकवायचे. डुप्लीकेट एटीएमच्या सहाय्याने पैसे निघत नसल्याने ग्राहक कंटाळून निघून जायचे. दीपक झा आणि त्याचा साथीदार ग्राहकाच्या आेरीजनल एटीएमच्या सहाय्याने पैसे काढून घ्यायचे. खात्यातून रक्कम काढल्याचा मेसेस येताच ग्राहकांना कळत होते की, त्यांची फसवणूक झाली आहे.