मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षाही कमी का? भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन जातानाचा व्हीडीओ आला समोर
By मुरलीधर भवार | Published: August 31, 2023 05:59 PM2023-08-31T17:59:33+5:302023-08-31T18:06:15+5:30
...त्यामुळे मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षा कमी आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण-काही दिवसापूर्वी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातून रद्दी घेऊन जाणाऱ््या रुग्णवाहिकेचा व्हीडीआे समोर आला होता. आता एक जण भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेत असल्याचा व्हीडीआे समोर आला आहे. या व्हीडीआेमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षा कमी आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
महपालिकेची दोन बडी रुग्णालये आहे. त्यापैकी कल्याणमध्ये रुक्मीणीबाई रुग्णालय आहे. तर दुसरे डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. रुक्मीणीबाई रुग्णालयात शव विच्छेदनाची व्यवस्था आहे. त्याठिकाणी शव विच्छेदनाचे काम केले जाते. आज एक व्यक्ती छत्रपती शिवाजी चौक ते रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दिशेने स्ट्रेचरवर मृतदेह भर रस्त्यातून घेऊन जात असल्याचा व्हीडीआे समोर आला आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात डा’क्टर आणि अन्य स्टाफची कमतरता आहे. रुग्णालयाने आऊट सोर्सिंग करुन करुन स्टाफ उपलब्ध करुन दिला जातो. रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्य सेवा सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी नागरीकांकडून केल्या जातात. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ही या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या आहेत. रुग्णलायात रुग्ण वाहिका आहेत. मात्र हा मृतदेह रुग्णालयात नेण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नसल्यानेच त्या व्यक्तीने स्ट्रेचरवरुन मृतदेह रुग्णालयात नेला असल्याचे उघड झाले आहे.
यासंदर्भात रुक्मीणीबाई रुग्णालयेच मुख्य अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम टिके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा मृतदेह बाजारपेठ पेलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. आम्हाला पोलिसांनी ही माहिती दिली नाही. आम्हाला माहिती दिली असती तर रुग्णवाहिका पाठविली असती.