मालकाने पगार थकविल्याने लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने घेतला गळफास
By मुरलीधर भवार | Published: April 22, 2023 07:03 PM2023-04-22T19:03:24+5:302023-04-22T19:03:33+5:30
-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले.
कल्याण-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले. आत्महत्या करणा:या कामगाराचे नाव कैलास अहिरे असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवल्या चिठ्ठीत त्याच्या डोक्यावर कर्ज होते. वखारीचा मालकाने त्याचा १६ महिन्यापासून पगार दिला नव्हता. एकीकडे कर्ज आणि मालकाकडून मिळत नसलेला पगार या विवंचनेतून कामगार कैलास याने आत्महत्या करुन जीवन यात्रा संपविली आहे. या घनटेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
कैलास हे राहण्यास डोंबिवली अहिरे गावात राहत होते. ते बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात कामाला होते. ते कारखान्यातच राहत होते. मात्र ते त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. कैलास यांना त्यांचा मालक पगार देत नसल्याने घर खर्च भागविण्यासाठी कैलासने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. त्याच्या डोक्यावर कर्ज होते. पगार होत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत कैलास होते. पगार होत नसल्याने घरच्यांना काय सांगायचे असा प्रश्न त्याच्या पुढे होते. तो घरी जात नव्हता. तीन महिन्यापासून त्याच्या कारखान्याचा मालक कैलासला पगार देण्याचे आश्वासन देत होता.
मात्र कैलास यांना पगार दिला गेला नाही. कैलास यांचा मुलगा यशवंत याने सांगितले की, वडील घरी येत नव्हते. कारखान्याचा मालक त्याच्या वडिलांकडून काम करुन घेत होता. मात्र घरी सोडत नव्हता. या घटनेची नोंद खडकपाडा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.