जलद लोकल समजून न आल्याने उतरण्याच्या नादात रेल्वे रुळात पडून युवतीचा मृत्यू

By अनिकेत घमंडी | Published: August 28, 2023 06:56 PM2023-08-28T18:56:22+5:302023-08-28T18:57:08+5:30

ठाकुर्ली स्थानकातील घटना मैत्रिणीच्या वाढीदिवसाला जात असल्याचे प्राथमिक तपासात समजले कारण 

A young woman died by falling on the train track during the descent due to not understanding the fast local | जलद लोकल समजून न आल्याने उतरण्याच्या नादात रेल्वे रुळात पडून युवतीचा मृत्यू

जलद लोकल समजून न आल्याने उतरण्याच्या नादात रेल्वे रुळात पडून युवतीचा मृत्यू

googlenewsNext

डोंबिवली: मेगाब्लॉक असल्याने नेमकी कोणती जलद की धीम्या गतीची लोकल आहे याचा अंदाज आला नाही, लोकल मद्ये चढल्यावर ती जलद असल्याचे समजताच त्या घाईत धावत्या लोकल मधून उतरण्याच्या नादात फलाट आणि रेल्वे रूळ यांच्यात सापडलेल्या युवतीचे अपघाती निधन झल्याची घटना रविवारी दुपारी ३.२०च्या सुमारास घडली. तिच्या वारसांचा शोध सोमवारी लागल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी संगितले की, भाग्यश्री शंकर शिंदे(१७) असे त्या मुलीचे नाव असून ती कृष्ण गोपाळ म्हात्रे चाळ, कुंभरखान पाडा, डोंबिवली पश्चिम येथील राहणारी होती. रविवारी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकल प्रवास करताना हा अपघात झाला, त्यात ती मयत झाली असल्याची माहिती त्यांनी प्रथमिक तपासवरून दिली. तिच्याकडे कोपरपर्यन्त तिकीट आढळून आल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. रविवारी दुपारी घटना घडल्यावर ती फलाट आणि रुळांत पडल्याने गंभीर जखमी झाली.

उपचारासाठी तिला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता तेथे तिला मयत घोषित करण्यात आले. तेव्हापासून लोहमार्ग पोलीस तिच्या वारसाचा शोध घेत होते, मात्र सोमवार सकाळपर्यंत त्याबाबत माहिती मिळाली नव्हती, काहिनी त्या अपघातबाबत समाज माध्यमांवर संदेश व्हायरल करून एक मोबाइल फोन त्यात दिला होता. अखेर सोमवारी दुपारी वारसाचा तपास लागला आणि त्यानंतर मयत मुलीच्या आईने ओळख पटवली, संध्याकाळी उशिरापर्यंत अन्य तंत्रिकबाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. जलद लोकल असताना ती ठाकुर्लीत थांबली का? नेमकी मुलगी कोणत्या स्थानकात चढली याबाबतची माहिती पोलिसांकडुन मिळू शकली नाही, पोलीस तपास,चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: A young woman died by falling on the train track during the descent due to not understanding the fast local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.