लग्नास नकार दिल्याने तरुणीची केली हत्या, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
By मुरलीधर भवार | Published: October 11, 2024 08:35 PM2024-10-11T20:35:27+5:302024-10-11T20:35:47+5:30
Kalyan Crime News: खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अमितकुमार लवकुश मोरया याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अमितकुमार लवकुश मोरया याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१५ साली घडलेल्या गुन्हयानुसार सायदा अकबर शेख या तरुणीला लग्नाची गळ आरोपी अमितकुमार याने घातली होती. लग्नास सायदा हीने नकार दिला होता. हा नकार अमितकुमार याला सहन झाला नाही. त्याने रागाच्या भरात सायदावर धारदार हत्याने प्राणघातक हल्ला केला. जखमी सायदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना सायदा हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात अमितकुमार याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिस अधिकारी विजय भिसे यांनी ठोस पुरावे गोळा केला. या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली.
कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी अमितकुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील रचना भोईर यांनी पाहिले. मात्र आरोपीच्या वकिलांकडून आरोपीची मागणी न्यायालयासमोर नमूद करण्यात आली होती. आरोपीने हा खटला कल्याण न्यायालयात न चालविता अन्य न्यायालात चालविला जावा अशी मागणी केली होती. न्यायालयाने आरोपीची मागणी मान्य केली नव्हती.