केडीएमसीची अभय योजना आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केली जाहीर

By मुरलीधर भवार | Published: May 19, 2023 06:21 PM2023-05-19T18:21:26+5:302023-05-19T18:21:55+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणी पट्टी करापोटी कोट्यावधी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.

Abhay Yojana of KDMC was announced by Commissioner Bhausaheb Dangde | केडीएमसीची अभय योजना आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केली जाहीर

केडीएमसीची अभय योजना आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केली जाहीर

googlenewsNext

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणी पट्टी करापोटी कोट्यावधी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अभय योजना जाहीर केली आहे. येत्या १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत या अभय योजनेचा लाभ थकबाकीदारांना घेता येणार आहे.

 या मुदत थकबाकीदार त्यांची थकबाकीची रक्कम भरु शकतात. अभय योजना लागू झाल्यापासून दिलेल्या मुदतीत थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवर आकारण्यात आलेी व्याजाच्या रक्कमेपैकी ७५ टक्क व्याज माफ केले जाणार आहे. १५ जून पासून लागू करण्यात येणाऱ्या या अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत जवळपास २५० कोटी रुपये जमा होऊ शकता असा प्राथमिक अंदाज  केला आहे.

महापालिका हद्दीत अभय योजना लागू करा हे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले होते अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.वाढीव मालमत्ता करापासून नागरीकांची मुक्तता व्हावी याकरीता मुख्यमंत्री शिंदे यंच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली होती. यावेळी या बैठकीस खासदारडॉ. श्रीकांत शिंदे, २७ गावातील पदाधिकारी यांच्यासह युवा सेना सचिव म्हात्रे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महापालिका हद्दीतील २७ गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा विषय होता. नागरीकांची वाढीव करातून मुक्तता व्हावी. त्यांना दिलासा देण्यात यावा. याकरीता अभय योजना लागू करा अशी मागणी युवा सेना सचिव म्हात्रे यांनी मागणी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश दिले. आयुक्तांनी महापालिका हद्दीतील थकबाकीदाराकरीता अभय योजना लागू केल्याचे आज जाहिर केले आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीपर्यंत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेतील २७ गावांसह कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे असे म्हात्रे यांनी सांगितले.
 

Web Title: Abhay Yojana of KDMC was announced by Commissioner Bhausaheb Dangde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.