मनसेची मागणी मान्य! कोकणात गणेशोत्सवासाठी भाविकांसाठी दिव्यातून विशेष ट्रेन

By प्रशांत माने | Published: August 24, 2022 09:01 PM2022-08-24T21:01:00+5:302022-08-24T21:01:42+5:30

आमदार राजू पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद

Accept the demand of MNS! Special trains from Divya for devotees for Ganesh festival in Konkan | मनसेची मागणी मान्य! कोकणात गणेशोत्सवासाठी भाविकांसाठी दिव्यातून विशेष ट्रेन

मनसेची मागणी मान्य! कोकणात गणेशोत्सवासाठी भाविकांसाठी दिव्यातून विशेष ट्रेन

googlenewsNext

प्रशांत माने

डोंबिवलीः कोकणी बांधवांना गणेशोत्सवासाठी दिवा स्थानकावरून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी कल्याण ग्रामीण चे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या मागणीला मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी प्रतिसाद दिला असून गणपती उत्सवासाठी दिव्या मधून देखील विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील दिवा,कल्याण, डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्याला आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण वासीय गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. या जनतेसाठी विशेष दिव्या मधून गाड्या सोडण्याची मागणी  आमदार पाटील यांनी केली होती यावर रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी दिवा रोहा चिपळूण पर्यंत एक गाडी वाढवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. पाटील यांच्या मागणीनुसार या ट्रेनमध्ये चार जीएस दिवा विभागासाठी आरक्षित करण्यात आले आहेत शिवाय सावंतवाडी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा सुरू आहे.तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा स्टेशन वरून सकाळी ६:२५ वाजता सुटणार असून ती सावंतवाडी येथे १८:३० वाजता पोहचणार आहे.तर या विशेष गाडीचा परतीचा वेळ सावंतवाडी येथून २०:१० वाजता सूर होणार असून दिवा येथे ०८:२५ आगमन होणार आहे. पाटील यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

गाडयांचे नियोजन

गणपती उत्सवासाठी गाडी क्रमांक ६१०११ दिवा रोहा चिपळूणपर्यंत वाढवण्यात आली आहे. 
वेळ असेल:  दिवा उपनगर सकाळी ९:१० 
रोहा आगमन ११:००
रोहा ११:०५ चिपळूण १३:२०
परतीच्या प्रवासात चिपळूण १३:२५ रोहा आगमन १६:१० वाजता आणि दिवा आगमन १८:४५ वाजता.

याशिवाय २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी क्रमांक ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. माननीय आमदारांच्या मागणीनुसार, या ट्रेनमध्ये ४ GS डबे दिवासाठी लॉक केले जातील. 

याशिवाय सावंतवाडीसाठी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा चालवली जात आहे. 
ट्रेन क्र. १०१०५ दिवा सकाळी ६:२५ ची सावंतवाडीला १८:३०
परतीचा प्रवास सावंतवाडी २०:१० वाजता आणि दिवा आगमन ०८:२५ वा.

Web Title: Accept the demand of MNS! Special trains from Divya for devotees for Ganesh festival in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.