उल्हासनगरात अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी गजाआड
By सदानंद नाईक | Updated: April 5, 2025 19:42 IST2025-04-05T19:41:45+5:302025-04-05T19:42:36+5:30
अखेर मुलीने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पंकज शुक्ला व पीडित तरुणी वेगवेगळ्या धर्माच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगरात अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी गजाआड
- सदानंद नाईक
उल्हासनगर : अत्याचाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने आरोपीला ९ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या पंकज शुक्ला याची एका लग्नात २२ वर्षीय मुली सोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर पंकज शुक्ला याने मुलीचे अश्लील व्हिडीओ काढून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केला. या अत्याचारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तरुणी ऐकत नाही म्हणून सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून, हातपाय तोडणाची धमकी दिली.
अखेर मुलीने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पंकज शुक्ला व पीडित तरुणी वेगवेगळ्या धर्माच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करून पंकजला अटक केली. न्यायालयाने ९ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली. असी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.