आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार, बदलापुरात जल्लोष
By पंकज पाटील | Updated: September 23, 2024 22:32 IST2024-09-23T22:31:02+5:302024-09-23T22:32:04+5:30
बदलापुरात दोन चिमुकला विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदलापुरातील वातावरण तापले होते.

आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार, बदलापुरात जल्लोष
बदलापूर: बदलापुरातील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार केले ही बातमी समोर येताच बदलापुरात अनेक राजकीय पक्षांनी जल्लोष केला. तसेच अक्षय शिंदे यांच्या विरोधात आंदोलन उभे करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील एकत्रित येत जल्लोष केला.
बदलापुरात दोन चिमुकला विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदलापुरातील वातावरण तापले होते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले. ही बातमी बदलापुरात कळतात अनेकांनी जल्लोष केला शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद उत्सव साजरा केला.
तर हे आंदोलन उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसेच्या संगीता चेंदवांकर , भाजपाच्या मीनल मोरे, शिंदे सेनेच्या पूजा टाकसाळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रियंका दामले यांनी देखील एकत्रित येत नगरपालिका कार्यालयासमोर जल्लोष केला. आरोपी अक्षय शिंदे याचा शेवट असाच होणे अपेक्षित होता असं म्हणत या महिला पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला.