जामिनावर सुटलेल्या आरोपींचे फटाक्यांनी स्वागत, जल्लोषात फरार व्यक्तीही झाला सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:00 AM2020-12-24T00:00:53+5:302020-12-24T00:01:13+5:30

Kalyan : पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या शैलेश म्हात्रे या केबल व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती, तर काही आरोपी फरार होते.

The accused, who was released on bail, was greeted with firecrackers | जामिनावर सुटलेल्या आरोपींचे फटाक्यांनी स्वागत, जल्लोषात फरार व्यक्तीही झाला सहभागी

जामिनावर सुटलेल्या आरोपींचे फटाक्यांनी स्वागत, जल्लोषात फरार व्यक्तीही झाला सहभागी

Next

कल्याण : केबल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्या स्वागतासाठी फटाके फोडून जल्लोष केल्याचा धक्कादायक प्रकार पूर्वेतील चिंचपाडा परिसरात घडला आहे. विशेष म्हणजे, या जल्लोषात एक फरार आरोपीही सहभागी झाला होता. एकूणच प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या शैलेश म्हात्रे या केबल व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती, तर काही आरोपी फरार होते. दरम्यान, म्हात्रे यांच्यावर हल्ला करणारे दोन आरोपी मंगेश पावशे आणि सचिन माळी यांची जामिनावर सुटका झाली. हे दोघेजण चिंचपाडा परिसरात आल्यानंतर, ते जणू काही मोठे युद्ध जिंकून आल्याच्या आवेशात त्यांचे फटाके फोडून स्वागत, तसेच जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात म्हात्रे यांच्यावर हल्ला करणारा आणि फरार असलेला अन्य एक आरोपीही सामिल झाला होता. 
कल्याणमधील या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त हाेत आहे. तसेच सर्वत्र या व्डिडीओची चर्चा सुरू हाेती.

आरोपी जामिनावर सुटले आणि जल्लोष केला. या जल्लोषात एक फरार आरोपीही सामील झाला होता. त्यांच्याकडून माझ्या जीविताला धोका आहे, असे तक्रारदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: The accused, who was released on bail, was greeted with firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.