कल्याण शीळ महामार्गावर कोंडीत भर घालणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 03:01 PM2020-11-25T15:01:02+5:302020-11-25T15:01:11+5:30
दुचाक्या, कार, हातगाड्या, टेम्पो आदी वाहनांचा समावेश
डोंबिवली: महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार /ई प्रभागक्षेत्र अधिकारी किशोर ठाकूर यांच्या पथकाने, कोळशेवाडी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात कल्याण- शिळ रोडवरील मोती मिठाईवाला ते नेपच्युन हॉस्पिटल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली ५ चारचाकी वाहने, १ बाईक व २ स्कुटी अशी ८ बेवारस/भंगार वाहने २ हायड्रा , ३ डंपरच्या सहायाने उचलून सदर वाहने महापालिकेच्या खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत, सदर कारवाई बुधवारी दिवसभरही सुरू ठेवली होती.
आय प्रभागक्षेत्रातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे व त्याच्या पथकाने व कोळशेवाडी वाहतूक शाखेच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात २ कार, १, टेम्पो, ५ बाईक, ३ हातगाडया, ३ स्टिल वाहतूक हातगाडया अशी एकुण १४ बेवारस/भंगार वाहने उचलून महापालिकेच्या खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.