४१ लाखांची वीजचोरी उघडकीस, कल्याणमध्ये १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई

By अनिकेत घमंडी | Published: October 17, 2022 04:03 PM2022-10-17T16:03:09+5:302022-10-17T16:03:46+5:30

४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

Action against 139 electricity thieves in Mohane area of Kalyan West | ४१ लाखांची वीजचोरी उघडकीस, कल्याणमध्ये १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई

४१ लाखांची वीजचोरी उघडकीस, कल्याणमध्ये १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

कल्याण: महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने वीज वाहीनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील १४९ वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्विस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मिटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सिल तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दीगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Action against 139 electricity thieves in Mohane area of Kalyan West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.