कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई; २० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस 

By अनिकेत घमंडी | Published: August 25, 2022 05:22 PM2022-08-25T17:22:55+5:302022-08-25T17:24:07+5:30

२० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले.

Action against 37 electricity thieves in Kongaon area dombivali | कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई; २० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस 

कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई; २० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस 

Next

डोंबिवली - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोनगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे गुरुवारी प्रसिद्धीपत्रकावरून जाहीर करण्यात आले.

गंगाराम सिताराम गायकवाड, सुखदेव राजाराम गायकवाड, रमेश चिंधु पाटील, सुदाम सुंदर गायकवाड, कैलास काशिनाथ गायकवाड, पुंडलिक चिंतामण गायकवाड, उमेश अशोक पाटील, बाळु जयराम गायकवाड, दिपक चंद्रकांत गायकवाड, धनश्री निलेश पाटील, उषा श्रीधर गायकवाड, कमलाकर गंगाराम गायकवाड, सुरेश जयराम पाटील, किरण सदु पाटील, हनुमान महादेव पाटील, सचिन गोरखनाथ पाटील, गोपीनाथ गणपत पाटील सर्व राहणार पिंपळास व संभाजी बबन पाटील, बाबू दुंदा पाटील, गुलाब राधे पाटील, बळवंत वामन पाटील, हेमंत नरेश पाटील, विलास मधूकर पाटील, मुरलीधर दत्तु पाटील, बिल्ला मंगेश पाटील, मंगेश बलु पाटील, पप्पू मंगेश पाटील, गणपत बी. पाटील, अविनाश मणिक जोशी, पिंटु मारुती जोशी, वंदना बिजु पाटील, श्रीराम सुकऱ्या पाटील, प्रमोद राजाराम पाटील, पंकज कबीर भंडारी, श्याम शंकर पाटील, वासंती तुकाराम पाटील, नारायण विष्णु कराळे सर्व राहणार कोनगांव यांच्याविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिषेक व्दिवेदी व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 
 

Web Title: Action against 37 electricity thieves in Kongaon area dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.