मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

By अनिकेत घमंडी | Published: December 25, 2023 04:54 PM2023-12-25T16:54:39+5:302023-12-25T16:55:48+5:30

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ गुन्हे नोंदवले असून २४,३३४ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ३.०५ कोटी रु.चा दंड वसूल केला.

Action against unlicensed hawkers by anti-hawker squad of Railway Security Force of Central Railway | मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

अनिकेत घमंडी,डोंबिवली: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द कारवाईची मोहीम राबवली आहे, आणि ट्रेनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम अंतर्गत  २४,३३९ प्रकरणे नोंदवून २४,३३४ जणांना अटक केली. त्या कारवाईत ३.०५ कोटी रुपये दंड वसूल केला.

एप्रिल ते नोव्हेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत फेरीवाला उपद्रव आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी पुढील  कारवाई करण्यात आली 

मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून ९३९३ जणांना अटक करून एकूण १.०२ कोटी रु.दंड वसूल करण्यात आला आहे. 

• भुसावळ विभागाने सर्वाधिक  गुन्हे दाखल असून सर्व विभागांमध्ये  ७२०६ गुन्हे दाखल असून ७२०५ लोकांना अटक करण्यात आली असून १.२९ कोटी रु.चा दंड वसूल करण्यात आला.

• नागपूर विभागात ३१८१ गुन्हे दाखल करण्यात आले आणि ३१७९ जणांना अटक करण्यात आली असून १ लाख रु.चा दंड वसूल केला आहे. 

• पुणे विभागाच्या आरपीएफने १९९० गुन्हे दाखल करण्यात आले आणि १९९१ लोकांना अटक करण्यात आली असून १३.८८ लाख  रु. दंड  वसूल केला आहे.

• आरपीएफ सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल करण्यात आले आणि २५६६ लोकांना अटक करण्यात आली असून २५.८७ लाख रु. दंड वसूल केला आहे.
 फेरीवाला विरोधी पथकाच्या सततच्या प्रयत्नांनी प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे समर्पण दिसून आले आहे. हे परिणाम रेल्वे नेटवर्कची अखंडता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी बांधिलकी जपत असल्याचा दावा रेल्वेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

Web Title: Action against unlicensed hawkers by anti-hawker squad of Railway Security Force of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.