विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र

By मुरलीधर भवार | Published: December 31, 2022 06:41 PM2022-12-31T18:41:55+5:302022-12-31T18:43:34+5:30

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण व मुरबाड विधानसभा जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपार करण्याची नोटिस बजावली आहे.

Action against Vijay Salvi unjustified; Public Library of Kalyan sent letter to Deputy Commissioner of Police | विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र

विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र

googlenewsNext

कल्याण-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण व मुरबाड विधानसभा जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपार करण्याची नोटिस बजावली आहे. ही नोटिस अन्यायकारक असून ती मागे घेण्यात यावी अशी मागणी कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना केली. कल्याणचे महानगर प्रमुख साळवी हे शिंदे गटात न जाता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहणो पसंत केले. ठाकरे गटात असलेले साळवी यांच्या विरोधात कल्याण पोलिस उपायुक्तांकडून तडीपार कारवाईची नोटिस बजावण्यात आली आहे. ही नोटिस साळवी यांनी सुरुवातीला घेतली नाही. आत्तापर्यंत पोलिसांनी ५६ नोटिसा बजावल्या आहेत. २३ तारखेला ही नोटिस घेण्यासाठी साळवी यांना बोलाविले होते. त्यांनी नोटिस घेतली. मात्र त्यावर त्यांचे कायदेशीर म्हणणो मांडण्याकरीता दहा दिवसाचा अवघी मागून घेतला आहे.

साळवी हे सामाजिक कार्यकर्ते आहे. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शहीद जवानांकरीता पोलिसांकरात रॅली काढली आहे. शहीद पोलिस आणि जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अनेकांना आरोग्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे नाहीत. असलेच तर राजकीय स्वरुपाचे गन्हे आहेत. त्यांच्या विरोधात तडीपारची नोटिस मागे घेण्यात यावी अशी मागणी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आणि सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केली आहे. हे वाचनालय शतेकाेत्तर सुवर्ण महाेत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने त्यांची मागणी पाेलिस प्रशासन विचारात घेते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या देखाव्यात पक्ष निष्ठा या विषयावर आधारीत देखावा विजय तरुण मंडळाने साकारला होता. हा देखावा देखील पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली होती.

Web Title: Action against Vijay Salvi unjustified; Public Library of Kalyan sent letter to Deputy Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण