कल्याण डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 05:15 PM2021-11-15T17:15:59+5:302021-11-15T17:16:26+5:30
ग प्रभागात डी.एन.सी. शाळेच्या मागे सुरु असलेले G+1 अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई सुरू असल्यानं भूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. डोंबिवलीत पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
ग प्रभागात डी.एन.सी. शाळेच्या मागे सुरु असलेले G+1 अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, ग प्रभाग सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या मागील शिरसाट यांच्या G+1 इमारतीचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी आणि 1 पोकलेन मशिनच्या सहायाने करण्यात आली.