KDMC ची बॅनर्स, टपऱ्या आणि शेडसह फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई
By मुरलीधर भवार | Published: October 12, 2022 03:42 PM2022-10-12T15:42:31+5:302022-10-12T15:42:45+5:30
घरडा सर्कल परिसरातील ६५ बॅनर्स, एक हातगाडी हटविण्यात आला. तसेच हातगाडीवर एक सिलिंडर जप्त करण्यात आला
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने बेकायदा बॅनर्स, शेड, टपऱ्या आणि फेरीवाल्यांच्या विरोधात विविध प्रभागात धडक कारवाई केली आहे. ब प्रभागातील खडकपाडा परिसरातील खाऊ गल्ली ते निकी नगर, गांधारी ब्रीज ते आधारवाडी सर्कल याठिकामी १२० लहान मोठे बॅनर्स हटविण्यात आले. तसेच साई चौक ते खडकापाडा चौकातील १५ फेरीवाल्यांना हटवून पदपथ नागरीकांकरीता मोकळा केला आहे.
क प्रभागातील दुर्गाडी मंदिर ते स्टेशन परिसरातील ३५ लहान मोठे बॅनस हटविण्यात आले. फूटपाथवरील १२ वजनकाटे, १४ प्लास्टीक शेड, चार लोखंडी स्टॅण्ड, ७ हातगाडय़ावर कारवाई करण्यात आली. जे प्रभागातील कोळसेवाडी , जुनी जनता बँक, काटेमानिवली पिरसातील चार शेड पाडण्यात आली. फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले. ड प्रभागातील पूना लिंक रोड, चक्कीनाका, शंभर फूटी रोडवलील १३० लहान मोठे बॅनर्स, तीन ङोंडे काढण्यात आले. फ प्रभागातील बाजी प्रभू चौक, नेहरु रोड, फडके रोडवरील ८५ बॅनर्स पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली गेली. आय प्रभागातील पिंगार बार ते व्यंकेटेश्वर पेट्रोल पंप, कल्याण शीळ रस्ता या भागातील ७० बॅनर्स हटविले गेल. तसेच घरडा सर्कल परिसरातील ६५ बॅनर्स, एक हातगाडी हटविण्यात आला. तसेच हातगाडीवर एक सिलिंडर जप्त करण्यात आला. ही कारवाई या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केली आहे.