अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच; कल्याण डोंबिवलीत बिल्डर धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 06:06 PM2021-10-07T18:06:07+5:302021-10-07T18:06:24+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई  सुरू असून पुन्हा दोन्ही शहरातील आय आणि एफ प्रभाग क्षेत्र परिसरातील  अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Action on unauthorized constructions continues; Builders in Kalyan Dombivali panicked | अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच; कल्याण डोंबिवलीत बिल्डर धास्तावले

अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच; कल्याण डोंबिवलीत बिल्डर धास्तावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

     कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई  सुरू असून पुन्हा दोन्ही शहरातील आय आणि एफ प्रभाग क्षेत्र परिसरातील  अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

      महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार फ प्रभागातील सहायक आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व, भोईरवाडी, खंबालपाडा येथील डॅडी चौक,कृष्णा व्हिला इमारतीच्या बाजूला जमिनमालक अशोक शेलार यांच्या मालकीच्या जागेवर बांधकामधारक चेतन पाटील व भगवान पाटील यांनी तळ+1 मजल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.  अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, अधिक्षक दिनेश वाघचौरे, टिळक नगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1, पोकलेन, 1 जेसीबी, 2 ब्रेकर यांच्या सहाय्याने  ही कारवाई करण्यात आली. 

    आय प्रभागातही विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आय प्रभागातील सहायक आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (पूर्व),मौजे द्वारली मलंग रोड रस्ता येथे पंडित सीताराम पाटील व इतर कृष्णा डेव्हलपर्स व हनुमान सरोदे यांचे 12 अनधिकृत गाळयांचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. येणाऱ्या काळातही अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title: Action on unauthorized constructions continues; Builders in Kalyan Dombivali panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.