डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:23 PM2021-10-18T19:23:33+5:302021-10-18T19:23:45+5:30
अनधिकृत इमारत आज पोकलेन मशिनच्या सहाय्याने,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने तसेच महापालिकेतील पोलिस विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे जमिनदोस्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई सुरू असून डोंबिवलीत पुन्हा एकदा बेकायदा इमारत पाडण्यात आली आहे. प्रशासनानं बेधडक कारवाई सुरू केल्यानं भूमाफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आयरे गाव डोंबिवली पूर्व येथील येथील बालाजी गार्डनच्या पाठीमागे चालू असलेल्या तळ+1 आर.सी.सी. अनधिकृत इमारतीच्या निष्कासनाची कारवाई 13 ऑक्टोबर रोजी ग प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत सुरु केली होती. ही अनधिकृत इमारत आज पोकलेन मशिनच्या सहाय्याने,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने तसेच महापालिकेतील पोलिस विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, ग व ह प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते, फ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील समक्ष उपस्थित होते.